Ad will apear here
Next
पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन
पत्रकार परिषदेत माहिती देताना राजेश टेकरीवाल, अंकुर मेहता, प्रतिभा मुळे, रोहित श्रीवास्तव, हेमंत जोगळेकर, रवी गुप्ता, आशिष रहंगडाळे आदी.पुणे : ‘हरिद्वार येथील सेवा शांतिकुंज परिवाराचे युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आयोजन ‘गायत्री परिवार’तर्फे करण्यात आले आहे. पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते होणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे,’ अशी माहिती ‘गायत्री परिवार’चे राजेश टेकरीवाल, अंकुर मेहता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी प्रतिभा मुळे, रोहित श्रीवास्तव, हेमंत जोगळेकर, रवी गुप्ता, आशिष रहंगडाळे उपस्थित होते. युगऋषी पंडित श्रीराम शर्मा यांच्या पुस्तक प्रदर्शनाचे हे पाचवे वर्ष आहे. युगऋषी यांनी आपल्या ८० वर्षांच्या तपस्वी जीवनात तीन हजार २००पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. याबरोबरच चार वेद, १०८ उपनिषदे, श्रुती व इतर ग्रंथांवर अभ्यास करून सर्वसामान्यांना समजेल अशा स्वरूपात त्याची मांडणी केली आहे.

ही पुस्तके जीवनातील प्रत्येक समस्येवर उपाय सांगणारी आहेत. आत्मबल, मनोबल वाढवून तणावातून मार्ग कसा काढावा याविषयी ही पुस्तके मार्गदर्शन करतात. सामाजिक काम करणाऱ्यांसाठीही ती उपयुक्त आहेत. हा सर्व ज्ञानाचा खजिना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विचारक्रांती अभियानाच्या माध्यमातून या पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. अतिशय सवलतीच्या दरात ही पुस्तके वाचकांना उपलब्ध होणार आहेत.

भारतीय संस्कृतीची बीजे तरुण पिढीमध्ये उतरावीत यासाठी परिवारातर्फे शाळा, महाविद्यालयांतून भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा आयोजित करण्यात येते. राजस्थान व छत्तीसगड या राज्यांनी तर ही परीक्षा शाळांमधून अनिवार्य केली आहे, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.

उद्घाटनाविषयी :
दिवस : शुक्रवार, आठ सप्टेंबर २०१७
वेळ : सकाळी १० वाजता
स्थळ : आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रस्ता, पुणे.

प्रदर्शनाविषयी :
कालावधी : आठ ते १७ सप्टेंबर २०१७
वेळ : सकाळी नऊ ते रात्री नऊ
स्थळ : आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रस्ता, पुणे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZYNBG
Similar Posts
‘वैचारिक क्रांतीसाठी ग्रंथसंपदा तरुणांपर्यंत पोहोचावी’ पुणे : ‘अवतीभोवती भौतिक सुविधा असल्या तरी, आज मानसिक शांतीचा अभाव दिसतो. अशावेळी पुस्तके आपल्या जीवनाला आधार देतात. मोबाईल, इंटरनेटच्या जमान्यात भरकटत असलेल्या तरुणाईमध्ये वैचारिक क्रांती घडायची असेल, तर युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या साहित्यासारखी चांगली ग्रंथसंपदा तरुण पिढीपर्यंत पोहोचावी,’
मंजूषा मुळीक बनल्या ‘मिसेस महाराष्ट्र २०१७’ पुणे : ‘मिसेस महाराष्ट्र २०१७’ या सौंदर्य स्पर्धेचा दुसरा सिजन नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. उंची, व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास, रॅम्पवॉक, इच्छाशक्ती, संवाद कौशल्य व परीक्षकांनी दिलेले गुण या निकषांवर मंजूषा मुळीक यांनी ‘मिसेस महाराष्ट्र २०१७’ चा किताब पटकावला.
चौधरी, भगत, जमदाडे, झुंझुरके विजयी पुणे : विजय चौधरी, किरण भगत, माऊली जमदाडे व मुन्ना झुंझुरके यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करताना पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील भारत-तुर्कस्थान लढतीत बाजी मारली. हिंदकेसरी साबा कोहालीला मात्र या वेळी पराभवाचा सामना करावा लागला.
‘ग्रीन सोसायटी’ स्पर्धेचे ​रविवारी उद्घाटन पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन, पुणे महानगरपालिका, सस्टेनॅबिलीटी इनिशिएटीव्ह, सस्टेनेबल लिव्हिंग इंटिग्रीएटेड सोल्यूशन्स, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ आणि गंगोत्री ग्रीन बिल्ड या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ग्रीन सोसायटी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील गृह संस्था व पुणेकरांना या स्पर्धेत सहभागी होता येत येणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language